चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा येथे शोककळा
प्रदीप मगन भोई-गजरे (३५, रा. चाळीसगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तितूर नदीला आलेल्या पुरात प्रदीप हा वाहून गेल्याची घटना मुंदखेडा-पातोंडा दरम्यान शनिवारी रात्री ८ वाजता घडली होती. प्रदीप हा मूळचा पिंपरी नांदू, ता. मुक्ताईनगर येथील रहिवासी होता. गेल्या सात-आठ वर्षांपासून मासेमारी व्यवसायासाठी तो सासरवाडी पातोंडा येथे वास्तव्यास होता. पिंपरी नांदू येथे रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.