जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील नॅक मान्यताप्राप्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगावतर्फे तीन दिवसीयबेसिक रिसर्च मेथडॉलॉजी कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली.
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव तर्फे महाराष्ट्र विद्यापीठ आरोग्य विज्ञान यांच्या मार्गदर्शनाखाली बेसिक रिसर्च मेथडॉलॉजी या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेदरम्यान मान्यवर वक्त्यांनी संशोधन रचना, साहित्य समीक्षा, डेटा संकलन पद्धती, सांख्यिकीय विश्लेषण, नैतिक समिती प्रक्रिया तसेच संशोधन लेखन या महत्वाच्या घटकांवर सविस्तर मार्गदर्शन केले.


विद्यार्थ्यांनी कार्यशाळेतील उपक्रम, प्रात्यक्षिके आणि गटचर्चांचा सक्रिय सहभाग घेतला.सहभागी विद्यार्थ्यांनी संशोधन विषय समजून घेण्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरल्याचे समाधान व्यक्त केले. नर्सिंग विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची पायाभरणी मजबूत करण्याच्या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली.कार्यशाळेचे उद्घाटन प्राचार्य व महाविद्यालयातील वरिष्ठ अध्यापक यांच्या उपस्थितीत झाले. कार्यक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापक, पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.महाविद्यालय प्रशासनाने भविष्यातही अशा प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या संशोधन क्षमतांना प्रोत्साहन देण्याचा मानस व्यक्त केला








