आमदार राजूमामा भोळे यांचा विरोधकांवर घणाघात, पत्रकार परिषदेत संकल्प पत्राचे विमोचन
जळगाव (प्रतिनिधी) :- आमच्यावर विरोधक विनाकारण टीका करीत आहेत. टीका करण्याआधी तुम्ही ‘माहिती अधिकार’मध्ये माहिती मागवा. तुम्हाला सत्य कळून येईल की, आम्ही गेल्या दहा वर्षात जळगाव शहरात किती विकास केला आहे, अशा शब्दांमध्ये आ. राजूमामा भोळे यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. मंगळवार दि. १२ रोजी भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत पक्षाच्या संकल्प पत्राचे विमोचन करण्यात आले.
पत्रकार परिषदेला महानगर जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, विधानसभा क्षेत्र प्रमुख विशाल त्रिपाठी, उदय भालेराव, मनोज भांडारकर, महेश जोशी उपस्थित होते. सुरुवातीला महानगर जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे यांनी भारतीय जनता पक्षाच्या संकल्प पत्राचा वचननामा याविषयी माहिती सांगून, पक्षातर्फे आगामी काळामध्ये कोणकोणत्या उपाययोजना करण्यात येईल याबाबत सविस्तर माहिती दिली. यानंतर आमदार राजूमामा भोळे यांनी सांगितले की, गेल्या दहा वर्षात आम्ही महिला, शेतकरी, युवा, उद्योग, व्यापार आदी सर्व क्षेत्रासाठी काम केलं जळगाव मध्ये ४ पूल मोठ्या प्रमाणात तयार झाले आहे. नवीन रस्ते तयार झाले आहे. आणखी काही कामे शिल्लक असून महायुतीची सत्ता आल्यावर ती कामे देखील मार्गे लागतील अशी माहिती आ. भोळे यांनी दिली दिली.
जळगाव शहरात वाढीव एमआयडीसी मंजूर झालेली असून त्याबाबत शासनाकडून सर्व्हे देखील झालेला आहे. यानंतर आता निवडणूक संपल्यानंतर त्याचे काम देखील सुरू होणार असून उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. त्याग, सेवा आणि समर्पण या भावनेतून आम्ही काम करीत आहोत, असेही त्यांनी सांगितले. यानंतर भारतीय जनता पक्षाचा वचननामा प्रसिद्ध करण्यात आला.