यावल (प्रतिनिधी) :- यावल तालुक्यातील थोरगव्हाण या गावात राहणाऱ्या एका तरूणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेवुन केली आत्महत्या केली असुन ,या घटनेची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे .
या बाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती वरून , मच्छिंद्र विनोद पाटील ( वय – २१ वर्ष ) राहणार थोरगव्हाण या ठिकाणी दि. २४ नोव्हेंबर शुक्रवार रोजी दुपार २ : ५० वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील छताच्या कळीला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे . याबाबत गावातील पोलीस पाटीत गजानन नारायण चौधरी यांनी पोलीस ठाण्यात खबर दिल्याने अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे . तरूणाने आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल का उचलले हे मात्र कळु शकले नाही . मयत मच्छिंद्र पाटील याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावलच्या ग्रामीण रुग्णालयात डॉ प्रशांत जावळे यांनी केले.