अमळनेर ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील कलाली येथील शेतात इलेक्ट्रीक तारांच्या शार्टसर्कीटमुळे ऊसासह ठिंबक नळ्या जळून खाक झाल्या. सुमारे साडे तीन लाखांचे नुकसान झाले आहे. मारवड पोलीसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.
प्रकाश धनसिंग पाटील यांचे कलाली शिवारातील गट नंबर ६०/२/अ मध्ये शेत आहे. त्यांनी शेतात ऊसाची लागवड केली होती. शनिवारी दुपारी शेतातून गेलेल्या महावितरण कंपनीच्या ताराच्या शार्टसर्कीटमुळे ऊसाला आग लागली. या आगीत शेतातील ऊस आणि ठिंबक नळ्या जळून खाक झाल्या सुमारे साडेतीन लाखांचे नुकसान झाले. आग लागताच पद्माकर पाटील यांनी अमळनेर नगरपालिकेचा अग्नीशमन बंब बोलाविला व आग विझविण्यात आली. प्रकाश पाटील यांच्या खबरीवरून मारवड पोलीस ठाण्यात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय पाटील करीत आहेत.