पाचोरा शहरातील घटना
पाचोरा (प्रतिनिधी) :- लग्नसमारंभासाठी आलेल्या पाहुण्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्रासह दोन सोन्याच्या पोत अज्ञात चोरट्यांनी धूम स्टाईलने ओरबाडून नेल्याची घटना पाचोरा शहरात भडगाव रोडवर घडली आहे. यात महिला जखमी झाली असून पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मीना अजितसिंग पाटील (वय ५३, पुणे) ही महिला २२ मे रोजी नातेवाइकांकडे लग्नाला आली होती. लग्नघरी पायी जात असताना, भडगाव रोड महामार्गावर एका हॉटेलसमोर भडगावकडून येत असलेल्या दुचाकीवरील दोन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील २८ ग्रॅमचे मंगळसूत्र व ४९ ग्रॅमची सोन्याची पोत असा एकूण १ लाख ८२ हजारांचा ऐवज गळ्यातून ओरबाडून पळून गेले. यावेळी महिलेने दुचाकीवर बसलेल्या मागच्या इसमाच्या शर्टाची कॉलर पकडली. मात्र, दुचाकी भरधाव नेत चोरांनी पळ काढला. यावेळी महिला खाली पडल्याने जखमी झाली. पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.