शवविच्छेदनातून स्पष्ट ; डॉ. जयप्रकाश रामानंद
जळगाव (प्रतिनिधी ) – गेल्या आठवडाभरापासून थंडी कायम आहे. रात्रीच नव्हे तर दिवसा देखील थंडी जाणवते. हा थंडीच्या कडाक्यात चार बेघरांचा जळगावात मृत्यू झाल्याचा अंदाज होता. परंतु, त्या चौघांचा मृत्यू हा वेगवेगळ्या आजारातून झाल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी सांगितले. त्या चौघांची ओळख पातळी असल्याचे सांगितले.
चार जणांचे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी मृतावस्थेत आढळून आले होते. शहरातील पांडे डेअरी चौक, निमखेडी रस्ता, रेल्वे स्टेशन व जिल्हापेठ परिसर अशा ठिकाणी चौघे बेघर आढळून आले. त्यांचा मृत्यू हा वाढलेल्या थंडीमुळे झाल्याच प्राथमिक अंदाज वर्तविला होता. त्यानुसार त्यांचे मृतदेह शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात नेले होते. तेथे त्यांचे आज शवविच्छेदन झाले.यात त्यांचा मृत्यू विविध आजारांमधून झाल्याचे डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी सांगितले.