• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तेली समाजाच्या राज्यस्तरीय मेळाव्यात लागला १ आदर्श विवाह

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 29, 2024
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
तेली समाजाच्या राज्यस्तरीय मेळाव्यात लागला १ आदर्श विवाह

राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्याचे मंत्री गुलाबराव पाटील, आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते उद्घाटन

श्री संत जगनाडे महाराज संस्थेच्या राज्यस्तरीय वधू-वर मेळाव्यात जुळले ७ विवाह, १४०० विवाहेच्छुक वधू – वरांची नोंदणी

जळगाव (प्रतिनिधी) :- येथील शारदा एज्युकेशन फाउंडेशन व श्री संत जगनाडे महाराज बहुद्देशीय संस्थेतर्फे रविवारी दि. २९ डिसेंबर रोजी सकाळी मोठ्या उत्साहात राज्यस्तरीय वधू-वर व पालक परिचय मेळावा पार पडला. या तेली मेळाव्यात ७ विवाह जुळले असून १ आदर्श विवाह या ठिकाणी पार पडला. तसेच मेळाव्यात १४०० हून अधिक विवाहेच्छुक वधू – वर यांनी नोंदणी करून परिचय करून दिला.

शांताराम नारायण चौधरी नगर, खान्देश सेंट्रल मॉल परिसरात आयोजित मेळाव्यामध्ये हजारोंच्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तेली समाजातील वधू-वर तसेच पालकांनी आपल्या पाल्यांच्या परिचय करून दिला. परिचय करून देणाऱ्या वधुना आयोजकांच्या वतीने श्री संत जगनाडे महाराज यांची प्रतिमा भेट देण्यात आली.

यांची होती उपस्थिती
व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, आ. राजूमामा तथा सुरेश भोळे यांच्यासह उद्योजक नंदू चौधरी, विनोद चौधरी, विजय चौधरी, धरणगावचे माजी नगराध्यक्ष संतोष चौधरी, सुरेश चौधरी, रामचंद्र चौधरी, निर्मला चौधरी, बबन चौधरी, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, दिंगबर चौधरी, शिवलाल चौधरी, माजी नगरसेवक दिंगबर चौधरी, ऍड. महेंद्र चौधरी, भास्कर चौधरी, मणिलाल चौधरी यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेले पदाधिकारी उपस्थित होते.

मान्यवरांनी व्यक्त केले मनोगत
तसेच पांडुरंग चौधरी, तेली समाज जिल्हाध्यक्ष सुरेश चौधरी, नंदू चौधरी, विजय चौधरी, अशोक चौधरी, निर्मला चौधरी, शोभा चौधरी, बेबाबाई सुरळकर आदी मान्यवरांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग आणि स्व.सदानंद चौधरी यांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

‘ब्रह्मगाठी’ वधू-वर परिचय पुस्तिकेचे प्रकाशन
प्रारंभी श्री संत जगनाडे महाराज यांच्या मूर्तीस मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ‘ब्रह्मगाठी’ या वधू-वर परिचय पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. ही पुस्तिका संपूर्ण राज्यात व देशातील काही भागातदेखील वितरित होत असते. मेळाव्याला गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश यासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पार पडला आदर्श विवाह
मेळाव्याच्या माध्यमातून जुळलेला एक आदर्श विवाह या ठिकाणी पार पडला. नव वर-वधूला मान्यवर शुभ आशीर्वाद दिला. धरणगाव येथील नगरसेविका लक्ष्मीबाई भगवान चौधरी यांचे नातू, माजी नगराध्यक्ष प्रतिभा संजय चौधरी यांचा भाचा, आशाबाई आणि गणेश चौधरी यांचे ज्येष्ठ चिरंजीव रुपेश यांचा नशिराबाद येथील वसंत गायकवाड यांची नातं, दिवंगत संजय गायकवाड यांची कन्या विद्या हिच्याशी मान्यवरांच्या उपस्थित पार पडला.

असे आदर्श विवाह अन्य समाजातही व्हावे : मंत्री गुलाबराव पाटील
समाजात पैसे खर्च करून मोठा विवाह करण्याची एक प्रथा पडली आहे. या प्रथेला तडा देत या नव वर-वधुनी समाजात एक नवीन ओळख निर्माण केली आहे. असा आदर्श विवाह इतर समाजातही व्हावे, असे आवाहन मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. तसेच त्यांनी नव वर-वधु यांना पुढील आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.

समाजापासून कधीही दूर जाऊ नका : आमदार सुरेश भोळे
प्रत्येक समाजाने काळानुसार बदल करून सामाजिक विवाह सोहळ्यात सहभागासाठी होण्यासाठी पुढे यायला पाहिजे. पतंगाप्रमाणे आयुष्यात तुम्ही कितीही वर जा, मात्र ज्या समाजाने आपल्याला घडविले, मोठे केले, ओळख दिली. त्या समाजापासून कशीही दूर जाऊ नका, असे आमदार सुरेश भोळे यांनी यावेळी सांगितले.

प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष प्रशांत सुरळकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन विशाल पाटील यांनी केले. सूत्रसंचालन संचालिका सरिता खाचणे यांनी केले. यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष प्रशांत सुरळकर, उपाध्यक्ष बबन चौधरी, विशाल पाटील, सचिव रामचंद्र चौधरी, संदीप चौधरी, अमोल चौधरी, योगराज चौधरी, डॉ. दीपक चौधरी आदींनी परिश्रम घेतले.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/12/WhatsApp-Video-2024-12-29-at-17.09.11.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/12/WhatsApp-Video-2024-12-29-at-17.09.10.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/12/WhatsApp-Video-2024-12-29-at-17.09.08.mp4

 

 

Tags: teli samajachya rajyastariy melavyat lagla ek aadarsh vivah news
Previous Post

फसवणूक झालेल्यांची १७ लाखांची रक्कम परत

Next Post

पारोळा तालुक्यातील जवानाचा भोपाळ येथे आकस्मिक मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पारोळा तालुक्यातील जवानाचा भोपाळ येथे आकस्मिक मृत्यू

पारोळा तालुक्यातील जवानाचा भोपाळ येथे आकस्मिक मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य दुचाकी रॅली उद्या
1xbet russia

भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य दुचाकी रॅली उद्या

April 11, 2026
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
1xbet russia

जळगावात ऑनलाईन परफ्युम विक्री व्यवसायाला सव्वा लाखांचा गंडा

April 11, 2026
हिंदू सिधु तीर्थस्थळ मंदिर उभारणीचा संकल्प आणि पारदर्शक कारभार
1xbet russia

हिंदू सिधु तीर्थस्थळ मंदिर उभारणीचा संकल्प आणि पारदर्शक कारभार

April 11, 2026
डॉ. आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर हल्ला
1xbet russia

डॉ. आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर हल्ला

April 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य दुचाकी रॅली उद्या

भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य दुचाकी रॅली उद्या

April 11, 2026
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

जळगावात ऑनलाईन परफ्युम विक्री व्यवसायाला सव्वा लाखांचा गंडा

April 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon