डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्पुटर एप्लीकेशन महाविद्यालयाचा उपक्रम
जळगाव (प्रतिनिधी):- डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्पुटर एप्लीकेशन महाविद्यालयात तेजस्विता २०२६ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तेजस्विता २०२६ चे उद्घाटन डॉ.उल्हास पाटील विधी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. नयना झोपे यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले,यावेळी महाविद्यालयाच्या प्रिन्सिपल डॉ. नीलिमा वारके देखील उपस्थित होत्या,मान्यवरांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व व सांस्कृतिक कार्यक्रमातील सहभाग याबद्दल मार्गदर्शन केले.२० फेबु्रवारी ते २५ फेबु्रवारी पर्यंत चालणा—या या वार्षिक स्नेहसंमेलनात तेजस्विता २०२६ अंतर्गत प्रोफेशनल डे (स्पोर्ट्स डे) मिस मॅच डे अँड किड्स डे रांगोळी, चॉकलेट डे, मेहंदी ,ट्रॅडिशनल डे, प्रेस कॉन्फरन्स ,सोशल ऍक्टिव्हिटी, कल्चरल डे ,डान्स, सिंगिंग, ड्रामा ई. स्पर्धा व कार्यक्रम घेण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे नियोजन प्रा. ऋतुजा नारखेडे यांच्या मार्गदर्शनाने होत आहे.










