भडगाव ( प्रतिनिधी ) – चाळीसगाव तालुक्यातील वाघळी गावाजवळ घडलेल्या तिहेरी अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना काल घडली .
भडगाव तालुक्यातील कजगाव रहिवाशी प्रल्हाद विठ्ठल महाजन हे संध्याकाळी चाळीसगावहुन कजगावकडे मोटरसायकने येत असतांना वाघळी गावाजवळ रस्त्यावरच्या दोन वाहनांची धडक झाली आणि त्यातील एक वाहन अनपेक्षितपणे त्यांच्या दुचाकीवर येऊन धडकले होते . दुचाकीवर असलेले प्रल्हाद महाजन ( ५१ वर्ष ) , त्यांचा मुलगा निवृत्ती महाजन ( वय २३) व नातू भूषण महाजन ( वय १६ वर्ष) यांना ही धडक बसली या अपघातात प्रल्हाद महाजन यांचा मृत्यू झाला निवृत्ती व भूषण जखमी झाले आहेत त्यांना चाळीसगाव येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
प्रल्हाद महाजन यांच्यावर आज शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले ते माळी समाजाचे अध्यक्ष रघुनाथ महाजन यांचे बंधू व ज्ञानेश्वर महाजन यांचे वडील होते .
प्रल्हाद महाजन पायांनी अपंग होते त्यांनी मेहनतीने शेतात पूर्णवेळ काम करून मुलांना मोठे केले नुकतेच त्यांनी घर बांधून व मुलाचे लग्न केले होते नेहमी कष्टाला प्राधान्य देणारे महाजन यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे आता आणलेल्या सुखाच्या दिवसांत कुटुंबातील कर्त्या पुरुषास मृत्यू आल्याने कुटुंबातील सदस्यानी हंबरडा फोडला
या रस्त्यावर अपघाताची मालिका सुरूच असून भरधाव वाहने अपघातास अनाहूत निमंत्रण देतात प्रशासनाने आतातरी वाहनाबाबतीत ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे , अशी तीव्र प्रतिक्रिया जनमानसातून उमटत आहेत