जाफ्राबाद;– तालुक्यातील टेंभुर्णी हे गाव बाजारपेठेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे आहे. या गावाला लागून असलेले जवळपास 40 ते 45 खेडे गावांमध्ये ग्रामीण रुग्णालय टेंभुर्णी हे आरोग्याच्या सोयी सुविधा पुरवित आहे .परंतु कोवीड -19 च्या काळात आरोग्य यंत्रणांवर ताण निर्माण निर्माण झाला त्यामुळे अचानक झालेल्या अपघातग्रस्त रुग्णांना, प्रसूती रुग्ण, सर्पदंश, विष बाधित रुग्ण यांना त्वरित उपचार मिळण्यासाठी प्रचंड समस्या भेडसावत होत्या.
त्याच पार्श्वभूमीवर या परिसरातील काही नागरिकांनी माननीय आमदार संतोष पाटील दानवे यांच्याकडे ग्रामीण रुग्णालय टेंभुर्णी ला रुग्णवाहिका मिळावी यासाठी विनंती केली होती. जेणे करून रुग्णांना लवकरात लवकर वैद्यकीय उपचार मिळून जिवित्वाचा धोका टाळता येईल, लगेचच आमदार संतोष पाटील दानवे यांनी ग्रामीण रुग्णालय टेंभुर्णी ला रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. त्या रुग्णवाहिकेचा आजआमदार संतोष पाटील दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार पडला.
यावेळी टेंभुर्णी येथील सरपंच गौतम म्हस्के राजेश चव्हाण सर्जेराव शिंदे संतोष पाचे प्रदीप मुळे डॉ प्रकाश साबळे विजय परिहार भिकन पठान हे मंच वर होते तर सोबत गणेश धनवई एल व्ही शिंदे अलकेश सोमानी दीपक जमधड़े मुख़्तार पठान प्रदीप भोपळे शरद गायमुखे सुरेश अण्णा मनोज शिंदे कपिल जाधव लहू मघाड़े सैफ शेख ज्ञानेश्वर उखर्डे प्रदीप काबरा सचिन गायमुखे दादाराव सवडे राजू खोत रामकिसन सोनसाळे गजानन अंधारे दत्ता सोनसाळे सोबत डॉ जायभाये डॉ नागरे डॉ वाघ डॉ जुबेर डॉ चव्हाण मैडम देशपांडे मैडम ग्राम सेवक सुखदेव शेळके आदी भाजपा ची तरुण मंडळी उपस्तिथि होती, या वेळी डॉ प्रकाश साबळे सरपंच गौतम म्हस्के यांनी आपला अभीप्राय नोंदविला या कार्यक्रमाचे सूत्र संचलन धोंडीराम कउटकर यांनी केले.
परिसरातील नागरिकांनी आमदार संतोष पाटील दानवे यांचे आभार मानले. भारतीय जनता पार्टी चे पदाधिकारी, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय कर्मचारी व परिचारिका आणि गावकरी उपस्थित होते.