जळगाव (प्रतिनिधी) : धरणगाव तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील पाळधी येथे जे. के. टायर्स मधून टायर चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जरी केले असून माहिती देणाऱ्यास ५१ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
पाळधी येथील जे के टायर्स येथे १० सप्टेंबर २०२० रोजी १ ते ३ वाजेच्या सुमारास चार ते पाच अज्ञात चोरटयांनी चोरी केली होती. त्यात सुमारे २३ लाखांची टायर्स चोरून नेण्यात आली होती. या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका चोरट्याला टिपण्यात आले आहे. त्याचे सिसिटीव्ही फुटेजमधील फोटो आणि रेखाचित्र एलसीबीने आणि धरणगाव पोलीस स्टेशनने जारी केले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाणार असून ५१ हजाराचे बक्षीस पोलिसांनी जाहीर केले आहे. ज्यांना चोरट्यांबद्दल माहिती असेल त्यांनी ९८२३० १९७११ किंवा ९४२२७ ४८५९० यावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.