रावेरमध्ये अहिरवाडी, जुनोना येथे वनविभागाची मोठी कारवाई
रावेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील अहिरवाडी आणि जुनोना येथे वनविभागाने अवैध डिंक तस्करीविरोधात मोठी कारवाई करत १६५ किलो सालई आणि धावडा डिंक जप्त केला आहे. या कारवाईत दोन दुचाकींसह ७२ हजार ९५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अहिरवाडी (कं. नं. ५) वनक्षेत्रात गस्त घालत असताना एका व्यक्तीला दुचाकीवरून गोण्या नेताना पकडण्यात आले. तपासणीअंती ९८ किलो सालई डिंक
हा १० हजार ७८० रुपये किमतीचा आणि (एमएच १९ एजी १७२३) क्रमांकाची दुचाकी हि १५ हजार किमतीची जप्त करण्यात आली. गस्तीदरम्यान एक तस्कर दुचाकीवरून डिंक घेऊन जात असताना दिसला. पाठलाग केल्यावर त्याने ५ हजार रुपयांच्या ४७ किलो सालई डिंकची गोणी फेकून पळ काढला.
जुनोना येथेही एक तस्कर दुचाकीवरून डिंक घेऊन जात असताना दिसला. वनअधिकाऱ्यांनी पाठलाग केला असता, तो (एमपी १० बीए १४६९) क्रमांकाची दुचाकी आणि ४ हजार रुपयांचा डिंक टाकून पसार झाला. १६५ किलो डिंक, २ दुचाकी असा एकूण किंमत ७२ हजार ९५० रुपये संपूर्ण मुद्देमाल आगरडेपो, रावेर येथे जमा करण्यात आला आहे.कारवाई करणाऱ्या पथकामध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे, वनरक्षक जगदीश जगदाळे, आयेशा पिंजारी, सविता वाघ, वनमजूर सुभाष माळी, इनुस तडवी, विनोद पाटील यांचा समावेश होता.