यावल तालुक्यातील मनवेल येथील घटना
यावल (प्रतिनिधी) :- तालुक्यातील मनवेल येथील २५ वर्षीय तरुणीने आपल्या राहत्या घरात ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मनवेल ता. यावल येथील रहिवाशी पुष्पा जितेंद्र कोळी (२५) ही तरुणी सोमवार २२ जानेवारी रोजी रात्री आपल्या घरी होती. मयत तरुणीच्या पश्चात आई, वडील व एक भाऊ आहे. घरात असताना सायंकाळी तिने घरातील लाकडी दांडीला ओढणीने बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार कुटुंबाच्या निदर्शनास येताच तातडीने यावल पोलिसांना माहिती देण्यात आली व तरूणीस यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. तेथे तिला मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात देविदास कोळी यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सिकंदर तडवी करीत आहे.