जळगाव (प्रतिनिधी)- शहरातील हरीविठ्ठल नगरात असलेल्या शामराव नगरात बुधवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास एका अल्पवयीन तरूणी नाल्यात वाहून आली. काही तरुणांच्या मदतीने तरुणीला बाहेर काढण्यात आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

गायत्री सुरेश मिस्तरी (वय १४), रा. कोळ न्हावी ता. यावल ह.मु.विश्वकर्मा मंदिर जवळ हरीविठ्ठल नगर जळगाव. असे मयत मुलीचे नाव आहे. रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे हरीविठ्ठल नगरातील नाला दुथडी भरून वाहत आहे. बुधवारी दुपारी शामराव नगर परिसरातील नाल्यात एक साप दिसल्याने परिसरातील नागरिक साप पाहत होते. त्याच वेळी नाल्यात एक १५-१६ वर्षीय तरुणी बेशुद्धावस्थेत वाहत आली. नागरिकांनी एका डॉक्टरांना बोलविले. डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता कोणताही प्रतिसाद नव्हता. परिसरातील काही तरुणांच्या मदतीने तिला बाहेर काढण्यात आले. शासकीय रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासणी अंती तिला मृत घोषित केले. रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान गायत्री ही पाय घसरल्याने ती वाहत्या नाल्याच्या पाण्यात पडली. हा प्रकार काही तरूणांच्या लक्षात आल्यामुळे तोपर्यंत गायत्री पाण्यात बेपत्ता झाली होती. अशी माहिती काही तरुणांनी जिल्हा रुग्णालयात पत्रकारांना दिली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मयत गायत्री हिच्या पश्चात वडील, आई, पाठीमागे ५ बहिणी असून गायत्री पाचवी आहे. वडील मिस्तरी काम करतात तर आई डॉ. ज्योती गाजरे यांचे दवाखान्यात सफाई कर्मचारी आहे. तिच्या आधीच्या ४ बहिणींचे विवाह झालेले आहे.







