सावदा ता. रावेर (प्रतिनिधी) – लग्नाचे आमिष दाखत गावातील 21 वर्षीय तरूणीवर अत्याचार करणार्या नराधमास सावदा पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, सावदा येथे राहणारी 21 वर्षीय तरूणीला सकाळी रनिंग करण्याच्या बहाण्याने संशयित आरोपी योगेश नरसिंग पुरभी (वय-25) रा. रोहिदास नगर सावदा ता.रावेर याने लग्नाचे आमिष दाखवत 29 मार्च 2021 आणि 10 एप्रिल 2021 रोजी वाघोदा रस्त्यावरी बांधकाम सुरू असलेल्या घरात बलात्कार केला. तरूणीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी योगेश पुरभी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आर.डी.पवार करीत आहे.