जळगावात मेहरूण भागात घडली होती घटना
जळगाव (प्रतिनिधी) : रामेश्वर कॉलनीतील राज शाळेजवळ जुन्या वादातून हर्षल उर्फ बब्या कुणाल पाटील (वय १८, रा. एकनाथ नगर, रामेश्वर कॉलनी) या तरुणावर धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याची घटना रविवारी १४ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता घडली होती. याप्रकरणी सोमवारी १५ सप्टेंबर रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन ८ जणांना अटक करण्यात आले आहे. यामध्ये तीन जण रेकॉर्डवरील गुन्हेगार असून एकावर तर या पूर्वी ‘एमपीडीए’चीदेखील कारवाई झालेली आहे.
जुन्या वादातून टोळक्याने हर्षल पाटील या तरुणावर रविवारी १४ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला होता. या प्रकरणी जखमीचा मित्र नितीन राजेंद्र देशमुख (वय २१, रा. मंगलपुरी, मेहरूण) या तरुणाने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सोहम् गोपाल ठाकरे, दिनेश भरत चौधरी, सनी उर्फ फौजी बाळकृष्ण जाधव, सागर फुलचंद जाधव उर्फ पाव (सर्व रा. रामेश्वर कॉलनी) या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ४ जणांसह ललित उर्फ अभय महेंद्र पाटील (वय २१, रामेश्वर कॉलनी), रोहन शांताराम घुले (वय २०, रा. अशोक किराणाजवळ), राहुल मोतीराम चव्हाण (वय ३०, रा. प्रियंका किराणाजवळ), पावन यादव सोनवणे (वय १९, रा. लक्ष्मी नगर, मेहरूण) यांनाहि अटक करण्यात आला आहे. अटक केलेल्यांपैकी सोहम् ठाकरे वगळता अन्य तिघे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यातील सनी जाधव याच्यावर या पूर्वी ‘एमपीडीए’चीदेखील कारवाई झालेली आहे.