पाचोरा शहरातील बसस्थानक परिसरात धक्कादायक घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- पाचोरा शहरात आज दि. ४ जुलै रोजी सायंकाळी सव्वा ६ वाजेच्या सुमारास थरारक घटना घडली आहे. पाचोरा बसस्थानकाच्या मुख्य गेट समोर एका तरुणावर अज्ञात व्यक्तींनी सिनेस्टाईल गोळीबार करत त्याची हत्या केली आहे. या घटनेमुळे पाचोरा शहरात तणाव पसरला असून तब्बल १२ गोळ्या फायर झाल्याची माहिती मिळत आहे.
आकाश कैलास मोरे (वय २६, रा. छत्रपती शिवाजीनगर, पाचोरा) असे आहे. सोमवारी दि. ४ रोजी संध्याकाळी दोन संशयित मारेकरी दुचाकीवरून आले आणि त्यांनी बसस्टॅण्डजवळ असलेल्या आकाश मोरेवर सिनेस्टाईल गोळ्या झाडल्या. नंतर मारेकरी घटनास्थळावरून फरार झाले. यावेळेला नागरिकांची धावपळ उडाली. पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेऊन जागा सील केली.(केसीएन)त्यांनी तात्काळ पंचनामा करून आकाश मोरेला पाचोरा ग्रामीण रुग्णालयात हलवलं. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं. शहरात नाकाबंदी सुरू असून मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.
परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून हत्याचे नेमकं कारण काय ते अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी तात्काळ फॉरेन्सिक लॅबला घटनेची माहिती दिल्याने फॉरेन्सिक व्हॅन देखील घटनास्थळी दाखल झालेली आहे.(केसीएन)पाचोरा पोलिसांनी गुन्हा नोंदवून अधिक तपास सुरू केला आहे. घटनेत तब्बल १० ते १२ राउंड फायर झाल्याची प्राथमिक माहिती हाती येत आहे. दरम्यान, भुसावळ शहरात अशा प्रकारचे खून होत असल्याची पार्श्वभूमी असताना मात्र शांत असलेल्या पाचोरा शहरात गुन्हेगारीची भयंकर घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.