अमळनेर तालुक्यातील शहापूर शिवारातील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील शहापूर येथील १८ वर्षीय तरुणाने झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना दिनांक १५ रोजी उघडकीस आली आहे. याप्रकरणी मारवड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शहापूर येथील भोलेनाथ समाधान भील (वय १८) हा आई वडिलांसोबत राहून बकऱ्या चारण्याचे काम करीत असे. दिनांक १५ रोजी सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास भोलेनाथ याने शहापूर शिवारातील नाल्याकाठी असलेल्या शेतात निंबाच्या झाडाला गळफास घेतल्याचे उघडकीस आले. त्यास अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ देविदास ईशी हे करीत आहेत.