जळगाव तालुक्यातील रामदेववाडी येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून जळगाव तालुक्यातील रामदेववाडी परिसरात एका तरुणाला मारहाण केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मंगळवारी दि. ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये ६ संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील रामदेववाडी गावात राहणारा प्रदीप राठोड याच्यावर गावात राहणारे काही जणांनी प्रेमप्रकरणाचा संशय घेतला. या कारणावरून सोमवारी ६ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजता दुर्गा देवी मंडळजवळील किराणा दुकानाजवळ गावात राहणारे कैलास विजय जाधव, विशाल अनिल जाधव, जीवन भंगराज जाधव, विवेक भंगराज जाधव, विकास धर्मसिंग जाधव, निलेश कैलास जाधव या सहा जणांनी प्रदीप राठोड याला पकडून बेदम मारहाण केली. यावेळी मुलाला मारहाण होत असल्याचे पाहून प्रदीप राठोडचे वडील विनोद राठोड हे मध्ये आले. त्यांना देखील लाकडी काठ्यांनी बेदम मारहाण करून दुखापत केली. याप्रकरणी प्रदीपचे काका प्रविण राठोड यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात मारहाण करणारे कैलास विजय जाधव, विशाल अनिल जाधव, जीवन भंगराज जाधव, विवेक भंगराज जाधव, विकास धर्मसिंग जाधव, निलेश कैलास जाधव (सर्व राहणार रामदेववाडी) यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ किरण पाटील हे करीत आहे.