जळगावातील नेरीनाका परिसरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील नेरीनाका स्मशानभूमीजवळ दुचाकीचा कट लागल्याच्या करणावरुन दोन जणांनी तरुणाला दगडासह कड्याने बेदम मारहाण करीत जखमी केले. याप्रकरणी दोघांविरुद्ध शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील खंडेराव नगरात अमिन युनूस मन्यार (वय २८, रा. खंडेराव नगर) हे वास्तव्यास असून ते इलेक्ट्रीशनचे काम करतात. दि. १४ डिसेंबर रोजी सकाळी पावणेदहा वाजेच्या सुमारास दुचाकीने जात असतांना समोरुन येणाऱ्यांना अमिन मन्यार यांच्या दुचाकीचा कट लागला. त्यावरुन त्या दोघांनी मन्यार यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद वाढतच गेल्याने त्या दोघांनी मन्यार यांना लाथाबुक्याक्यांनी मारहाण केली.
तसेच दुचाकीस्वार तरुणाने दगडाने तर त्याच्या मागे बसलेल्याने कड्याने मारहाण करीत गंभीर जखमी केले. दरम्यान, जखमी मन्यार यांनी तात्काळ शनिपेठ पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार मारहाण करणाऱ्या दोघ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकों रविंद्र बोदवडे हे करीत आहे.