जामनेर ( प्रतिनिधी ) – शहरातील बस स्थानक परिसरात वडिलांनी दिलेले दोन हजार रुपयांचे सुट्टे आणण्याकरिता गेलेल्या मुलाला काही अज्ञात मुलांनी बेदम मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल व रोख दोन हजार रुपये हिसकावून पसार झाले. या प्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती वरून, बोदवड रोड बीबी फातिमा बालवाडी शेजारी जुन्या बोदवड रोड जामनेर येथे राहणारा शेख मुनिस शेख नासिर ( वय -२१ ) हा शिक्षण घेत असून त्याचे वडील यांनी त्याला दोन हजार रुपयांची नोट देऊन पाच जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बस स्थानक परिसरात पाठविले.
यावेळी अज्ञात मुलांनी त्याचा रस्ता अडवून बेदम मारहाण करून त्याच्याकडील दोन हजार रुपये रोख व मोबाईल हिसकावून घेतला घेतला याप्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक मोहिते करीत आहे.