रावेर येथे महाविकास आघाडी उमेदवार प्रचारार्थ कार्यकर्त्यांचा मेळावा
रावेर : केंद्रातील भाजप व राज्यातील महायुती सरकारच्या कारभारामुळे बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे . तरुण वर्ग बेरोजगारीच्या खाईत ढकलला जात असून यामुळे प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. अश्या स्थितीत तरुणाच्या हाताला काम देऊन या बेरोजगारीच्या राक्षसचा अंत करू पाहणाऱ्या उमेदवाराला मतदारांनी साथ द्यावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रावेर लोकसभा मतदार संघातील उमेदवार श्रीराम पाटील यांनी केले आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी उमेदवार प्रचाराच्या नियोजनासाठी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मंगलम लॉन्स, रावेर येथे प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी राजकारणात नवी कोरी पाटी असलेले व तरुणांच्या हातांना काम देणाऱ्या उमेदवाराला प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे, प्रत्येक गावातून तसेच प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून मोठ्या संख्येने मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन यावेळी वक्त्यांनी केले.
मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील, आमदार शिरीषदादा चौधरी,माजी आमदार अरुणदादा पाटील,राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे महीला प्रदेशाध्यक्षा रोहीणीताई खडसे, कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद, राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे लोकसभा प्रमुख अतुल पाटील, शिवसेना(उबाठा) लोकसभाक्षेत्र प्रमुख प्रल्हाद महाजन,माजी झेडपी अध्यक्ष मुरलीधर तायडे,किसान सभेचे सोपान पाटील,बाजार समिती संचालक मंदार पाटील, शिवसेना उबाठा रविंद्र पवार,राष्ट्रवादी शरद पवार गट तालुकाध्यक्ष किशोर पाटील,शिवसेना (उबाठा) योगिराज पाटील,राजेश घोरपडे, कॉग्रेस तालुकाध्यक्ष तथा बाजार सिमिती संचालक राजेंद्र पाटील,धनंजय चौधरी,राष्ट्रवादी शरद पवार गट शहराध्यक्ष मेहमुद शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला. यावेळी मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे कार्येकते पदाधिकारी पदाधिकारी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
केवळ राजकारण नाही
सत्तेसाठी व पदांसाठी सध्या राजकारणाची पातळी अगदी खालावली असून त्यामुळे सर्वसामान्यांचा विश्वास उडाला आहे. महाविकास आघाडीकडे या घाणेरड्या राजकारणपलीकडचे विकासाचे व्हिजन आहे. विकास हा केवळ शब्दांमधून होत नसतो त्यासाठी व्हिजन व दृष्टिकोन लागतो तो दृष्टिकोन शरद पवार यांच्याकडे आहे. महाविकास आघाडी बेरोजगारी व महागाई या सर्वसामान्यांच्या जिव्हाळीच्या विषयांवर हि निवडणूक लढवत आहे. आणि आता बदल नक्की घडेल असा विश्वास श्रीराम पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.