भुसावळ ( प्रतिनिधी ) – भुसावळातील ईदगाहच्या मागील अरबी मदरसा येथून एका तरूणाच्या घरातून सोन्याचे दागिने, दोन मोबाईल आणि रोकड असा एकुण ५३ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे बुधवारी उघडकीला आले आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ बाजार पेठ पोलीसांनी दिलेली माहिती वरून, मोईनोद्दिन कयामोद्दिन काझी (वय-३३) रा. नवीन ईदगाह, अरबी मदरसाजवळ, भुसावळ हे आपल्या परिवारासह राहायला आहे. २३ ऑगस्ट रोजी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरातून सोन्याचे दागिने, दोन मोबाईल आणि रोकड असा एकुण ५३ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे समोर आले आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात जावून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ निलेश चौधरी करीत आहे.