जळगावातील पिंप्राळा भागातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील पिंप्राळा भागातील सोनी नगरातील सार्वजनिक मैदानात क्रिकेट खेळण्यावरून एका तरुणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात २ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंप्राळा भागातील सोनी नगरातील सार्वजनिक मैदानात काही तरुण बुधवारी २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता क्रिकेट खेळत होते. क्रिकेट खेळून झाल्यावर वेदांत नरेश बागडे याच्याशी पियुष समाधान पाटील आणि पियुष कैलास कोळी यांनी किरकोळ कारणावरून वाद घातला. त्यानंतर पियुष समाधान पाटील आणि पियुष कैलास कोळी या दोघांनी लोखंडी रॉडने वेदांत बागडे यांच्या डोक्यात मारून जखमी केले.
यात वेदांत बागडे हा गंभीर जखमी झाला. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले. दरम्यान वेदांतने दिलेल्या फिर्यादीवरून गुरुवारी २२ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पियुष समाधान पाटील आणि पियुष कैलास पाटील या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील हे करीत आहे.