यावल तालुक्यातील घटना
यावल (प्रतिनिधी) :- तालुक्यातील दहिगाव येथील रहिवासी तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडून आलेला आहे. या घटनेबाबत यावल पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दहिगाव शिवारात २४ फेब्रुवारी रोजी ही घटना उघडकीस आली आहे.
दहिगाव नावरे रस्त्यावरील रहिवासी देवेंद्र प्रभाकर जंजाळे (वय ३७) या तरुणाने त्याच्या घरामागील शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याबाबतची माहिती देवेंद्रचा लहान भाऊ भूपेंद्र जंजाळे यांनी यावल पोलिसात दिली. यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यावलच्या ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी यांनी मयत देवेंद्र जंजाळे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले. मयत तरूणाने आत्महत्या का केली हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही.