जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीतील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात बुधवारी, १६ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास आई आणि पत्नी वरच्या मजल्यावर असताना तरुणाने राहत्या घराच्या खालच्या खोलीत गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कृष्णा रामदास पाटील (वय ४२)असे मयत तरुणाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. बुधवार सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास त्यांची आई आणि पत्नी घराच्या वरच्या मजल्यावर गेल्या होत्या. याच वेळी कृष्णा पाटील घरात एकटे असताना, त्यांनी राहत्या घराच्या खालच्या खोलीत गळफास घेतला.(केसीएन)घरातील सदस्यांना ते गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसताच, त्यांच्या आईने केलेला हृदय हेलावणारा आक्रोश ऐकून शेजारी मदतीला धावले.
त्यांनी तात्काळ कृष्णा पाटील यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. कृष्णा पाटील यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबावर आणि परिसरात शोककळा पसरली आहे.(केसीएन)या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.