अमळनेर तालुक्यातील शिरुड शिवारातील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील इंदापिंप्री येथील २६ वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघड झाली आहे. त्याच्यावर कर्ज झाल्याने त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
चेतन जगदीश पाटील (वय २६) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आईसह राहतो. या तरुणाने ६ रोजी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास शिरूड शिवारात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलीस पाटील भानूदास पाटील यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे करीत आहेत.