जळगाव ( प्रतिनिधी ) – गोलाणी मार्केटजवळील ओपो मोबाईल सर्व्हिस सेंटरच्या दुकानासमोरून एका तरूणाचा दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शनिवारी १७ जून रोजी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती वरून, हरीष दिलीप खैरनार (वय-३०) रा. शिवाजी नगर, जळगाव हा तरूण पॅथॅलॉजीचे काम करतो. कामासाठी त्यांच्याकडे (एमएच २५ व्ही १०७२) क्रमांकाची दुचाकी आहे. १४ जून रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास गोलाणी मार्केटजवळील ओपो मोबाईल सर्व्हिस सेंटरच्या दुकानासमोर त्याने दुचाकी पार्क करून लावली होती. दुचाकी पार्क केल्यानंतर कामानिमित्त निघून गेला होता. अज्ञात चोरट्यांनी पार्कींगला लावलेली दुचाकी चोरून नेली. दुचाकी चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर हरीष खैरनार यांनी शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार शनिवारी १७ जून रोजी रात्री ८ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक योगेश पाटील करीत आहे.