शहरातील इच्छादेवी चौकातील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) –घरामध्ये बहीण स्वयंपाक करीत असताना वरील मजल्यावर जाऊन रामकृष्ण छबू वैराट (२७, रा. इच्छादेवी चौक) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ५ सप्टेंबर रोजी रात्री इच्छादेवी चौक परिसरात घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रामकृष्णच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. रामकृष्ण वैराट हा तरुण मजुरी काम करून कुटुंबाला हातभार लावत होता. ५ सप्टेंबर रोजी रात्री तो घराच्या वरील मजल्यावर गेला व गळफास घेतला. काही वेळाने त्याचे वडील त्याला जेवणासाठी बोलवायला गेले असता मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्यावेळी त्याला तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी प्रचंड आक्रोश केला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.