जळगाव ( प्रतिनिधी ) – कामाच्या ठिकाणी जाऊन येतो असे सांगून घरातून गेल्यावर बेपत्ता झालेल्या सुप्रीम कॉलोनीतील तरुणाचा मृतदेह आज पोलिसांना मेहरूण तलावात आढळला . त्याने आत्महत्या केली असावी असा प्रार्थमिक अंदाज आहे.
सुप्रीम कंपनीमध्ये नोकरीला असलेला व सुप्रीम कॉलोनीमध्ये राहणारा महेंद्र पाटील हा ३३ वर्षीय तरुण १७ नोव्हेम्बररोजी दुपारी कामाच्या ठिकाणी जाऊन येतो असे सांगून घरातून बाहेर पडला होता उशिरापर्यंत तो परत न आल्याने त्याच्या आई सुनंदा पाटील यांनी १८ नोव्हेम्बररोजी एम आय डी सी पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची खबर दिली होती . आज त्याचा मृतदेह मेहरूण तलावात आढळला . त्याची मोटरसायकल मेहरुन तलाव येथे दिसली होती म्हणून त्याचा पो हे कॉ संजय धनगर व महेंद्रसिंग पाटील यांनी तलाव परिसरात शोध घेतला होता आज सकाळी सात वाजेच्या सुमारास त्याचे प्रेत मेहरुन तलावा मध्ये सापडले अशी माहिती मिळाल्यावर पो हेकॉ सचिन मुंडे , मुकेश पाटील यांनी घटनास्थळी जाऊन शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय वै.द्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पाठवला.