कुटुंबीयांचा मन हेलावणारा आक्रोश. जळगावातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील एमआयडीसी परिसरातील सुप्रिम कॉलनीतील ३० वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी २७ जुलै रोजी दुपारी २ वाजता उघडकीला आला आहे. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेली नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पवन अमरसिंग पवार (वय-३० रा. सुप्रिम कॉलनी, जळगाव) असे मयत तरूणाचे नाव आहे. पवन पवार हा तरूण आई दुर्गाबाई, वडील अमरसिंग, मोठा भाऊ अर्जून, लहान भाऊ आकाश, पत्नी आणि वहिनी या परिवारासह वास्तव्याला होता. बांधकाम मिस्तरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. गुरूवारी २७ जुलै रोजी दुपारी २ वाजता घरातील सर्वजण कामाला निघून गेले होते. पवनची आई दुर्गाबाई या कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. त्यामुळे पवन हा घरात एकटाच होता. त्याने राहत्या घराच्या मधल्या खोलीत दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली.
या तरुणाने आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. दरम्यान, त्यांची आई घरात आल्यानंतर मुलाचा मृतदेह पाहून त्यांनी हंबरडा फोडला. शेजारी राहणाऱ्या तरूणांनी धाव घेत त्याला खाली उतरवून तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. चंदन महाजन यांनी तपासणीअंती मयत घोषीत केले. पवन पवार याचा विवाह तीन महिन्यापुर्वीच झालेला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक अतुल पाटील करीत आहे.