जळगाव शहरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील सुप्रीम कॉलनी येथील रहिवासी तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी दि. ९ जून रोजी उघड झाली आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मनोज गजानन साकरे (३०, रा. सुप्रिम कॉलनी, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आहेत. मजुरी काम करणारे मनोज साकरे यांच्या पत्नी माहेरी गेलेल्या होत्या. त्यामुळे ते घरी एकटेच होते. रविवार दि. ९ मे रोजी सकाळी त्यांनी गळफास घेतला. त्या वेळी शेजारील काही जणांना ते गळफास घेतल्याचे दरवाजातून दिसले. त्यानंतर साकरे यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.