भुसावळ शहरातील घटना
भुसावळ ( प्रतिनिधी ) – शहरातील पीओएच कॉलनी परिसरात राहणाऱ्या नीलेश अरुण खांडवे या ३८ वर्षीय तरुणाने राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी दि. १ जून रोजी दुपारी चारच्या सुमारास उघडकीस आली. भुसावळ शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रविवारी दुपारी नीलेशचा मोठा भाऊ मंगेश कामावरुन घरी परतल्यानंतर आईने त्याला सांगितले की, नीलेश झोपलेला आहे. मंगेशने नीलेशच्या खोलीचा दरवाजा ठोठावला. मात्र, कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्याने खिडकीतून आत डोकावले असता, नीलेशने छताच्या पंख्याला गळफास घेतल्याचे दिसून आले. या प्रकरणी शहर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.