जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील वाघनगरात २३ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सायंकाळी उघडकीला आली रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली

करण संजय शिंदे (वय-२३) हा वाघनगरात आईवडील व भावासोबत वास्तव्याला होता त्याचे वडील संजय शिंदे यांचे श्रीधरनगरात लॉन्ड्रीचे दुकान आहे. मंगळवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास त्याने घराच्या वरच्या मजल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. तरुणाच्या आत्महत्येचे कारण लगेच समजू शकले नाही.
दरम्यान, बाजूच्या खोलीत झोपलेला लहान भाऊ नितीन याच्या लक्षात येताच त्याने तातडीने शेजाऱ्यांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांनी त्यास मृत घोषित केले. रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . मयताच्या पश्चात आई शारदा, भाऊ नितीन आणि वडील संजय शिंदे असा परिवार आहे. तपास स.फौ. सुरेश लोखंडे करीत आहेत.







