यावल तालुक्यातील साकळी येथील घटना
यावल (प्रतिनिधी) :- तालुक्यातील साकळी या गावातील २४ वर्षीय तरुण बकर्यांसाठी चारा घेण्यासाठी गेला होता. मात्र, तो नंतर घरी परतलाच नाही. त्याचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह गावालगत असलेल्या कब्रस्तानजवळील शेत विहिरीत आढळला. तातडीने मृतदेह त्यातून काढून यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
साकळी गावातील रहिवासी सलीम उर्फ गोलू सायबु तडवी (वय २४) हा तरुण मंगळवारी रात्री आपल्या घरी सांगून गेला होता की, मी बकर्यांसाठी चारा घ्यायला जात आहे मात्र तरुण घरी परतलाच नाही व त्याचा मृतदेह गावालगत असलेल्या तडवी समाजाच्या कब्रस्तानजवळील वसंत चिंधू महाजन यांच्या शेत विहिरीत आळढला. तातडीने त्याला विहिरीतून काढण्यात आले व यावल ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. बुधवारी शावखा बाबू तडवी यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अर्जुन सोनवणे करीत आहे.