चाळीसगाव तालुक्यात गणेशपूर येथील घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील गणेशपूर येथे झाडाचा पाला तोडण्यासाठी गेलेल्या ३८ वर्षीय तरुणाचा शेततळ्यात पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची घटना शुक्रवारी दि. १ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
हिलाल दगा पाटील (३८, रा. गणेशपूर ता. चाळीसगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी हिलाल हा सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास गणेशपूर शिवारात शेतात झाडाचा पाला घेण्यास गेला होता. शेततळ्याजवळून शेतात जात असतांना, त्यांचा पाय घसरून शेततळ्यात पडले. हा प्रकार आसपासच्या शेतकऱ्यांना कळताच त्यांनी शेततळ्याकडे धाव घेतली. शेततळ्यात पाणी असल्याने आणि शेततळ्यात कागद अंथरलेला असल्याने, दोरखंड आणून हिलाल पाटील याना शेततळ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा पाण्यात बुडून मृत्यु झाला होता. या घटनेने गणेशपूर गावात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.