जळगाव (प्रतिनिधी) – एका ३५ वर्षीय तरुणाचा संशयास्पद रित्या मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली असून मृतक तरुणाच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली होती . शेख गफ्फार शेख जब्बार (वय-३५) रा. उस्मानियॉ पार्क असे मयत तरूणाचे नाव आहे. तरुणाचा घातपाताने मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा संशय आहे.
गफ्फार शेख हे बांधकामाचे काम करतात . २६ जानेवारी रोजी सायंकाळी काम आटोपून घरी निघाले होते. रात्री उशीरापर्यंत घरी न आल्याने नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला असता कोठेही आढळून आले नाही. आज गुरूवारी २७ रोजी सकाळी त्यांचा मृतदेह ममुराबाद नाक्याजवळील लेंडी नाल्याजवळ आढळून आला . जानेवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास ममुराबाद रोडवरील कोंबडी फार्मजवळ त्यांचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला. त्यांच्या डोक्यावर, हनुवटीवर मार लागल्याचे दिसून आले आहे. यावेळी मयताच्या नातेवाईकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रचंड गर्दी केली होती. दरम्यान तरुणाचा मृत्यू घातपात झाल्याने असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. दरम्यान मयताच्या पश्चात आईवडील, पत्नी, भाऊ व दोन मुलांसह शहरातील उस्मानिया पार्क शिवाजी नगर येथे वास्तव्याला आहे.