जळगाव तालुक्यातील विटनेर येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील विटनेर येथील मुकबधीर ३९ वर्षीय तरुणाने १० सप्टेंबररोजी कर्जबाजारी असल्याने शेतात विषारी औषध सेवन केले होते. जिल्हा शासकीय रुग्णालयात १९ दिवस आयसीयूमध्ये उपचार सुरु असताना काल रात्री या सुनिल बोबडे तरुणाचा मृत्यू झाला.
आज सकाळी शवविच्छेदन करून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विटनेर येथील मुकबधीर सुनील जगदेव बोबडे नावाच्या तरुण शेतकऱ्याने शेतात कपाशी लागवड केली आहे. या कपाशीवर लाल्या रोग व पाऊस जास्त झाल्यामुळे नुकसान झाले आहे. सुनीलने स्टेट बँकेकडून कर्ज घेतले होते.शेतात पिक येणार नाही म्हणून काही दिवसापासून तो नैराश्यात होता. दि. १० रोजी दुपारी शेतात जाऊन विषारी औषध सेवन करुन घरी आला यावेळी त्यांच्या घरच्याना वास आला व त्याची तब्येत खालवली
मोठ्या भावाने लोकांच्या मदतीने त्याला जळगाव शासकीय रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल केले. १९ दिवस उपचार सुरू असताना काल रात्री त्याचा मृत्यू झाला एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये जळगाव शासकीय रुग्णालयातील CMO डॉ. श्रावणी हुंबे यांनी खबर दिल्यावरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली पुढील प्राथमिक तपास पो. हे. काँ. सचिन मुढे, छगन तायडे हे करीत आहे सुनील बोबडे याच्या पश्चात आई, भाऊ, वहिनी असा परिवार आहे.







