जळगाव (प्रतिनिधी ) – शहरातील शिवाजीनगरातील एका ३२ वर्षीय तरुणाने डोक्यावर कर्ज असल्याने त्याने कर्जदारांच्या सततच्या त्रासाला कंटाळून राहत्या घरात आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार २० रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास उघडकीस आला असून यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान मयताच्या भावाने कर्जदारांनी धमकावले गेले असल्याने हि आत्महत्या केल्याचा आरोप केला आहे.
समीर रामदास बांदल वय ३२ रा. शिवाजीनगर हुडको, जळगाव असे मयत तरुणाचे नाव आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की , समीर हा पुण्यात एका खासगी कंपनीत कामाला असून त्याच्या चुलत भावाच्या जागरण गोंधळाच्या कार्यक्रमानिमित्त तो जळगावी १८ रोजी आला होता . मात्र १९ रोजी पुन्हा तो पुण्याला परतणार असल्याने तो रिझर्व्हवेशन करण्यासाठीही गेला होता . मात्र त्याला कर्जदारांनी धमकावले असल्याचे मत त्याचा भाऊ शिवाजी नागर येथील शिवसेनेचा विभाग प्रमुख विजय लक्ष्मण बांदल वय ४० याने व्यक्त केला आहे.
गळफास घेतल्यावर समीरचा भाऊ विजय लक्ष्मण बांदल याने जळगाव शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी समीरला मयत घोषित केले. सदर समीरचे मयताचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून मात्र त्याच्या पश्चात दीड आणि तीन वर्षांच्या दोन मुली असून त्याची पत्नी ही दोन महिन्यापासून माहेरी असल्याचे समजते. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोद करण्यात आली आहे.तपास करुणा सागर जाधव व ललित भदाणे हे करीत आहे.