शिंदखेडा तालुक्यातील सोनेवाडी गावातील घटना
धुळे (प्रतिनिधी) : शिंदखेडा तालुक्यातील सोनेवाडी परिसरात तापी नदी काठावर गेले असताना दोघे बहीण भावांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी दि. २ रोजी दुपारी उघड झाली आहे. घरात घटस्थापना करण्यापूर्वी पुर्वी घरातील कानबाई मातेला तापी नदीत अंघोळ घातली जाते. त्यानुसार देवीला अंघोळीसाठी नेण्यात आले होते. तेव्हा बहिण भावाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शिंदखेडा तालुक्यातील सोनेवाडी या गावात घडली.
वैष्णवी पाटील (वय १७) आणि उत्कर्ष पाटील (वय १३) असे नदीत बुडून मृत झालेल्या भावाबहिणींचे नाव आहे. शिंदखेडा तालुक्यातील सोनेवाडी गावातील सुरेश अंकुश पाटील व रमेश अंकुश पाटील या दोन्ही भावांचा परिवार घरात घटस्थापना करत असतात. घटस्थापनेपूर्वी ते घरातील कानबाई मातेचे आंघोळीसाठी तापी नदी काठावर गेले होते. यावेळी सुरेश पाटील आणि रमेश पाटील या दोन्ही भाऊंचे कुटूंबातील सदस्य येथे असतांना सुरेश पाटील यांची मोठी मुलगी वैष्णवी पाटील आणि रमेश पाटील यांचा मोठा मुलगा उत्कर्ष पाटील हे दोन्ही तापी नदी काठावर पाण्यात उतरले.