रावेर तालुक्यात निंभोरासीम येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- रावेर तालुक्यात निंभोरा येथे तापीनदीपात्रात हातपाय बांधलेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह गुरुवारी दि. २४ जुलै रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास आढळून आला आहे. सदर घटनेचा निंभोरा पोलीस तपास करीत असून महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
निभोरा येथील पोलीस पाटील यांना तापी नदी पात्रात एका महिलेचा मृतदेह असल्याची माहिती नागरिकांनी दिली. त्यांनी तत्काळ निंभोरा पोलीस स्टेशनचे एपीआय हरिदास बोचरे यांना दिली. एपीआय बोचरे यांनी तत्काळ टीमसह घटनास्थळी धाव घेतली. (केसीएन)ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. सदर मृतदेह हा कुजलेल्या अवस्थेत मिळून आल्याने तत्काळ वैद्यकीय पथक व मोबाईल फॉरेन्सिक पथक घटनास्थळी बोलाविण्यात आले. त्यांनी जागीच पंचनामा करून शवविच्छेदन केले. तर त्यानंतर मृतदेह पोलिसांनी रीतसर दफन केला. महिलेचे हात व पाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने घटना आत्महत्या कि घातपात याबाबत चर्चा सुरु झाली आहे. पोलीस सर्वबाजूने तपास करत असून सदर महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.