पारोळा येथे महामार्गावरील घटना
पारोळा ( प्रतिनिधी ) – पारोळा शहरातील बायपास हायवेवर मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास कॅप्सूल टँकर पलटी होऊन मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरू झाली आहे. गॅस गळती रोखण्यासाठी पोलीस प्रशासन, महसूल व जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. याबाबत आपत्ती व्यवस्थापनाला देखील कळवण्यात आलेले असून पोलीस निरीक्षक सुनील पवार, शहर तलाठी निशिकांत माने यांच्यासह पोलिस यंत्रणा मोठा फौजफाटा लावण्यात आला आहे.
हा ग्रीन लाईन कंपनीचा टँकर होता. त्यात लिक्विड नॅचरल गॅस साधारण १५ टन आहे. चालक सुभाषचंद्र सरोज (वय ३३, प्रतापगड, उत्तर प्रदेश) हा होता. परिसरात ॲम्बुलन्स व अग्निशामकाचे वाहने देखील उपलब्ध ठेवण्यात आले आहे. गॅस गळतीमुळे परिसरातील नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून काहींचे स्थलांतर करण्यात येत आहे.