जळगाव तालुक्यातील आव्हाणे शिवारातील घटना
जळगाव (प्रतिनिधी ) – तालुक्यातील आव्हाणे शिवारातील लक्ष्मी जिनिंग येथून तांब्याची तार, ऑइल आणि लोखंडी पट्ट्या असा एकूण २ लाख ८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील आव्हाणे शिवारातील लक्ष्मी जिनिंग येथे दिनांक १२ ते १३ ऑगस्टच्या कालावधीमध्ये अज्ञात चोरट्यांनी जिनिंगच्या वॉल कंपाउंडची भिंत तोडून आत प्रवेश करत लोखंडी तार डीपीचे ऑइल आणि लोखंडी पट्ट्या असा २ लाख ८ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार गुरुवारी १४ ऑगस्ट रोजी दुपारी १.३० वाजता समोर आला.
या संदर्भात अविनाश वसंत भालेराव (वय ५०,रा. आराधना अपार्टमेंट, आदर्श नगर, जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान जळगाव शहरांमध्ये घरफोडी प्रचंड वाढल्या असून गस्ती पथकाद्वारे पोलिसांनी नियंत्रण ठेवावे, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.