जळगाव ( प्रतिनिधी ) — तांबापुरा परिसरातील बिस्मिल्ला चौकात घरासमोर उभ्या तरूणाला एकाने कारण नसताना काठीने मारहाण केल्याची घटना गुरुवारी घडली. मारहाण करणाऱ्या तरुणाविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

तांबापुरा परिसरात बिस्मिल्ला चौकात शेख सादिक शेख सलीम (वय-३४) हे वास्तव्यास आहेत. मिस्तरी काम करून ते कुटूंबाचा उदरनिर्वाह भागवतात. गुरुवारी ते त्यांच्या घरासमोर उभे असताना टिपू ऊर्फ भैय्या शेख सलीम ( रा. बिस्मिल्ला चौक ) याने काहीही कारण नसताना शेख सादिक यांना काठीने हातावर तसेच पाठीवर मारहाण करून दुखापत केली. शेख सादिक यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोहेकॉ अल्ताफ पठाण करीत आहेत.







