पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथील घटना
पारोळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील तामसवाडी येथे ३१ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता घडली. याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
चंचल चंद्रकांत बेलदार (वय ३१, तामसवाडी, ता. पारोळा) असे मृत महिलेचे नाव आहे. तिने राहत्या घराच्या मागील बाजूस असलेल्या पत्र्याच्या शेडमधील लोखंडी अँगलला सुती दोरीच्या गळफास घेतला. ग्रामस्थांच्या लक्षात येताच तिला कुटीर रुग्णालय, पारोळा येथे आणण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. नरसिंग बेलदार यांच्या खबरीवरून पारोळा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस नाईक जयंत सपकाळे करीत आहे.