पाचोरा ( प्रतिनीधी ) – आठ वर्षांपूर्वी शिंदाड येथे याञेनिमित्त झालेल्या तमाशात गोंधळ घालणाऱ्या १६ जणांविरुध्द गुन्हा नोंदवण्यात आला होता. पाचोरा न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे.
शिंदाड येथे ‘गैबानशा बाबा’ यांच्या ‘उरूस’निमित्त याञेचे आयोजन केले जाते . सन २०१२ मध्ये तमाशा सुरू असतांना काही नागरिकांनी गोंधळ घालून तमाशा कलावंत स्त्री, पुरुषांना मारहाण केली म्हणून पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस स्टेशनमध्ये प्यारेलाल वाघ यांच्या तक्रारीवरून १६ जणांविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला होता.
सन २०१५ पासून पाचोरा न्यायालयात न्या एफ. के. सिद्दीकी यांच्यासमोर सुनावणी सुरु होती . फिर्यादी व साक्षीदार महिला कलावंत यांचे जबाब झाले. आरोपींतर्फे अॅड. अभयपाटील व अॅड दिपक पाटील यांनी व सरकार पक्षातर्फे अॅड माने यांनी काम पहिले.