स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) – तलवारीचा धाक दाखवून दहशत माजविणाऱ्या आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तालवारींसह यावल तालुक्यातील न्हावी येथून अटक केली आहे. केतन पाटील असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि,
स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, जळगाव यांना मिळालेल्या गुप्तबातमी मिळाली की, न्हावी गावातील वाणीवाडा भागात राहणार केतन पाटील याचे कडेस तलवार असून तो तलवारीचा धाक दाखवून दहशत माजवित असतो.
त्यावरून पोलीस अधीक्षक डॉ प्रविण मुढे सो जळगाव, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, यांचे मार्गदर्शना खाली किरणकुमार बकाले यांच्या पथकातील पोह महेश आत्माराम महाजन, अक्रम शेख, याकुब शेख, चालक विजय गिरधर चौधरी यांचे पथक तयार करुन न्हावी गावात जावून केतन मधुकर पाटील, वय २७, रा. वाणीवाडा न्हावी ता. यावल यास ताब्यात घेवून त्यास विचारपुस केली असता त्याने त्याचे राहते घरातून ३ तलवार काढून दिल्याने त्याचे विरुध्द फैजपूर पो.स्टे.ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.