एमआयडीसी पोलिसांची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील लक्ष्मीनगर जळगाव येथे दि. २० मार्च रोजीमध्यरात्री हनुमान मंदीरजवळ एक इसम हा त्याचे हातात लोखंडी तलवार घेवुन दहशत माजवीत असल्याबाबत पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना माहीती मिळाली होती. त्यानुसार त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
सदर ठिकाणी जावुन छापा टाकला असता तेथे संशयित आदेश पांडुरग सपकाळे (वय २७ वर्षे, रा. एस.एम. आयटी कॉलेज जवळ, म्हाडा कॉलनी, जळगाव) हा त्याचे ताब्यातील मारुती सियाज कंपनीची कार क्रमांक (एम.एच ०३ सि.एम.९५९) या कार मधुन त्याचे हातात तलवार घेवुन उतरतांना मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले. त्याचे कडील तलवार व कार जप्त करण्यात आली असुन त्याचे विरुध्द पो.कॉ. नितीन ठाकुर यांनी फिर्याद दिली आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि/दिपक जगदाळे, पो.कॉ. मुकेश पाटील, साईनाथ मुंढे, छगन तायडे अशांनी केली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पो.हे.कॉ. रामकृष्ण पाटील हे करीत आहेत.