एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे फरकांडे चौफुलीवर एक ५५ वर्षीय प्रौढ हा तलवार घेऊन दहशत माजवताना आढळून आला म्हणून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याच्यावर अटकेची कार्यवाही सुरू होती. कासोदा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.
कासोदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार शुक्रवार दि. २९ ऑगस्ट रोजी पहाटे दीड वाजेच्या सुमारास फरकांडे चौक येथे एक ईसम हातात तलवार घेऊन दहशत करीत असल्याची त्यांना माहिती मिळाली.(केसीएन)त्यांनी तात्काळ त्यांच्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवले. त्या ठिकाणी संशयित आरोपी राघव रामा कुवर (वय ५५, रा. गलवाडा रोड, कासोदा) हा तलवार घेऊन दहशत करताना दिसला. त्याला तात्काळ ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणण्यात आले. त्याच्याकडून तलवार जप्त करण्यात आली आहे. सदरची कारवाई कासोदा पोलीस स्टेशनचे सपोनि निलेश राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल श्रीकांत गायकवाड हे करीत आहे.